Skip to content
- कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून,
…. चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून.
- यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब
…. चे नाव घेण्यास मी करत नाही विलंब.
- गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी,
…….. रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी.
- वर्षाऋृतूत वरूणराजाने केली बरसात,
….. चे नाव घेण्यास केली मी सुरूवात.
- बारीक मणी घरभर पसरले,
…… साठी माहेर विसरले.
- पुरूष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता,
….. रावाचं नाव घेते तुम्हां सर्वांकरिता.
- लग्नात लागतात हार आणि तुरे,
…. च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.
- चंदनी पानात मुग्ध कळी हसली,
…. रावांच्या प्रेमात मी नकळत फसली.
- रुपेरी सागरावर चंदेरी लाट,
…. रावांचं नाव घेते सोडा माझी वाट.
- परसात अंगण, अंगणात तुळस,
…. नाव घ्यायचा मला नाही आळस.
- रूक्मिणीने केला पण कृष्णाला वरीन,
…. च्या साथीने आदर्श संसार करीन.
- हो-नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे,
…. मुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे.
- इंग्रजीत म्हणतात मून,
…. चंं नाव घेते …. ची सून.
- सर्वांना नमस्कारासाठी जोडते हो हात.
…. रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट.
- आवडतं सर्वांना पुढचं पाऊल,
…. चं नाव घेते कुंकू लावून.
- चांदीच्या ताटात गाजराचा हलवा.
….. रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा.
- चांदीचे जोडवे पतीची खूण,
…. रावांचे नाव घेते …. ची सून.
- आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा,
…. चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.
- आदेश भाऊंचा कार्यक्रम आहे होम मिनिस्टर,
याचं नाव घेते करून मॅरीज रजिस्टर.
- बकुळीचे फुल सुकले तरी जात नाही सुगंध।
…..रावांसाठी माहेर सोडले तरी तुटत नाहीत ऋणानुबंध.
- वरळी वांद्रे लिंक सी फेस आहे मुंबईची शान
.. रावांचे नाव घेते राखते तुमचा मान..!
- अक्षता पडताच..अंतरपाट होतो दूर,
…. रावांच्या मुळे सौभाग्यवती झाले..सांगतात सनईचे सूर..!
555