निळ्या आकाशात चमचमणारे तारे..
नाव घेते अर्चना लक्ष द्या सारे..
नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं
नवरोबाला शेवटी आहो च म्हणायचं..
साध्या वरण-भातावर साजूक तूप घालायचं..
अहो च्या आईला आता सासुबाई म्हणायचं..
छोटी छोटी म्हणत घरभर फिरणारी त्यांची
बहीण नणंदबाई चा तोरा गाजवणार..
अहो च्या भावाला, म्हंजे माझ्या दिराला
माझ्या लेकराप्रमाणे सांभाळ करनार..
अहोंच्या वडिलांना वडील माणायचं..
दारातल्या पाहुण्यांना घरात घ्यायच..
राहुल पाटलांचे नाव घेउन
मते पाटलांच्या घरात enter व्हायचं..