Mothe ukhane in marathi – मराठी मोठे उखाणे

येत होते जात होते खिडकीवाटे पाहत होते | Yet hote jat hote khidkiwate pahat hote

येत होते जात होते,
खिडकीवाटे पाहत होते,
खिडकी लागली कानाला,
खिडकीला तीन तारा,
अडकीले घुंघर बारा,
पान खाते कराकरा,
घाम येतो दरदरा,
तिकडून आला व्यापारी,
व्यापारीनं दिली सुपारी,
सुपारी देते वाण्याला,
हंडा घेते पाण्याला,
पाणी आणते गंगेचे,
वाडा बांधते भिंगाचं,
वाड्यात वाडे सात वाडे,
एका वाड्यात पलंग,
पलंगावर गादी,
गादीवर उशी,
उशीवर होती कप-बशी,
कपबशी दिली पाहुण्याला,
त्यांनी पाहिलं समोरच्या भिंतीला,
भींतीवर होती घड्याळ,
घड्याळात वाजले एक,
… रावांचे नाव घेते,
… ची लेकं.


सासरचा गाव चांगला, गावामध्ये बंगला …

सासरचा गाव चांगला,
गावामध्ये बंगला
बंगल्याला खिडकी
खिडकीत द्रोण
द्रोणात तुप
तुपा सारखे रूप
रूपा सारखा जोडा
चंद्रभागेला पडला वेढा
चंद्रभागेची पाच नाव
नावेत बसावं
आणि
… रावांनी देहू, आळंदी, पंढरपूर, फिरवावं.

आडगाव माझ सासर जयपुर माझ माहेर | Adgaon Maze Sasar Jaipur Maze Maher

आडगाव माझ सासर ,
जयपुर माझ माहेर ,

गावात घर, घरासमोर अंगण,
अंगणात मोठे प्रांगण,

प्रांगणात तुळशीचे वृंदावन,
वृंदावना समोर रांगोळी,

नाव घेते हळदीच्या वेळी,
नाव घ्या, नाव घ्या,
नावात काय असत,


नावात असत,
लहानांच मोठेपण,
मोठ्यांचा थोरपण,
थोरांचा मान,
तोच आमचा स्वाभिमान,
… रावांच नाव घेऊन ठेवते सर्वांचा मान.

नाव घेते नाव, सासर हेच आता माझं गाव | Nav Ghete Nav, Sasar Hech Maze Gaon

नाव घेते नाव,
सासर हेच आता माझं गाव,

गावात बांधाला बंगला,
बंगल्याला लावला चुना,
चुण्यावर नेसली साडी,

साडीला लावला चाप,
… माझे बाप,

दारात होती जाई,
… माझी आई,

ताटात होता खाऊ,
…. माझा भाऊ,

कपाटात ठेवली चैन,
….माझी बहीण,

पाण्याला चालली गवळण,
… माझी मावळण,हातात होती अंगठी,
त्यावर चंद्राची खून,
… रावांचे नाव घेते,
…. रावांची सून.


कणकण कुदळी, मन-मन माती | kan kan kudali, man man mati

कणकण कुदळी, मन-मन माती, 
पोचारल्या भीती, चेतरले काम,
सासूबाईच्या पोटी जन्मले राम,
राम गेले हटा,
हटावून आणल्या करडी,
त्याच्या घेतल्या आरडी,
उरल्या सुरल्या शिक्यावर ठेवल्या,
शिक तुटलं, भांडं फुटलं,
वगळ गेला परस दारी,
परसदार म्हणतं नाव घे पोरी,
नाव काय फुकटचं,
नाव हळदी कुंकवाचं,
हळदी कुंकवाने भरले ताट,
…राव बसले जेवायला
तर समया लावते तीनशे साठ.

आग्रह केला तुम्ही म्हणून घेते खास नाव,
सासू आहे माझी दुसरी माऊली,
वाटते मला सुखाची सावली,
सासर्‍यांचा आहे खूपच रुबाब,
देत नाही त्यांना कोणी उलटा जवाब,
जे असतात नेहमी हसरे,
… राव माझे सासरे,
येऊ देत नाही माझ्या डोळ्यात आसु,
….. माझी सासु,
मैत्रिणीसारखी आहे माझी ननंद,
नाव त्यांचे घेताना होतो मला खूप आनंद,
बहिणीसारखी आहे माझी जाऊ,
… ताई आपण दोघी खूप सुखाने राहू,
मागणं मागते पाहून श्रीकृष्णाची मूर्ती,
वाढत राहो माझ्या सासरची सुख-समृद्धी आणि कीर्ती,
.. रावांचा आणि माझा लाखात एक जोडा, 
.. रावांचा आणि माझा लाखात एक जोडा,
आता तरी तुम्ही आमची वाट सोडा.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *