• फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान,
    …. च्या नादाने झालो मी बेभान.
  • कळी हसेल, फुल उमलेल, मोहरून येईल सुगंध,
    …… च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद.
  • परातीत परात चांदीची परात,
    …. लेक आणली मी …. च्या घरात.
  • …. माझी आहे सर्व कलांमध्ये कुशल,
    तुमच्या येण्याने झाला दिवस एकदम स्पेशल. 
  • द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान,
    …. चे नाव घेतो ऐका देऊन कान. 
  • संतांच्या अभंगात आहे अमृतवाणी,
    माझी …. म्हणते मधुर गाणी. 
  • श्रावणात पडतो रोज पारिजातकाचा सडा,
    आमच्या ….. आवडतो गरमगरम बटाटेवडा. 
  • पाच बोटातून होते कलेची निर्मिती,
    …. वर जडली माझी प्रीती. 
  • खेळत होतो पब्जी आला ब्लू झोन,
    आमच्या हिचं नाव घेतो गेट टू द सेफ झोन.
     
  • ब्रम्हदेवाच्या पुत्राचे आहे नाव कली,
    तू माझी देवसेना नं मी तुझा बाहुबली. 
  • वादळ आलं,
    पाऊस आला,
    मग आला पूर… हिचं नाव घेतो,
    भरून तिच्या भांगेत सिंदूर. 
  • केसर दुथात टाकलं काजू,
    बदाम, जायफळ,
    हिचं नाव घेतो,
    वेळ न घालवता वायफळ. 
  • तू पुण्याची मिसळ,
    मी मुंबईचा वडापाव,
    लग्नाला हो म्हणायला हिने खाल्ला जास्तच भाव.
  • चांगली बायको मिळावी म्हणून फिरलो गल्ली ते दिल्ली पण हिच्याकडेच होती माझ्या हृदयाची किल्ली. 
  • अलिबाबाने गुफा उघडली म्हणून खुल जा सिम सिम,
    हिचं नाव घेतो आता पडतोय पाऊस रिमझिम. 
  • काट्यात काटा गुलाबाचा काटा,
    हिचं नाव घेतो गुलाबजाम खाता खाता. 
  • अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा,
    …. ला घास भरवतो वरणभात तूपाचा. 
  • आंबा गोड, ऊस गोड,
    त्याहीपेक्षा अमृत गोड,
    …..चे नाव आहे अमृतापेक्षाही गोड. 
  • काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून,
    …..चं नाव येतं मात्र माझ्या हृदयातून. 
  • हा दिवस आहे आमच्याकरिता खास,
    …. ला देतो गुलाबजामचा घास

देवळात प्रवेश करण्यासाठी, नाही कुणाला बंदी,
__ रावांच्या आयुष्यात येण्याची, भेटली मला संधी.

युक्ती आणि शक्तीची, पुण्याई येथे मोठी,
___ रावांचे नाव घेते, छत्रपती शिवरायांचे नाव नेहमी आमच्या ओठी.

जुळल्या रेषा नशिबाच्या, येता हाती हात,
_ आणि ___ची जोडी बघताच, सर्व म्हणतात क्या बात, क्या बात.

खुश ठेवा मला, नको माणिकमोती,
__ राव नेहमी ऱ्हावा, तुम्ही माझ्यासोबती.

अरेंज म्यॅरेजमध्ये कसा जोडीदार मिळेल, याची होती भिती,
परंतु __ रावांच्या येण्याने, बदलली माझी स्तिथी.

दूर डोंगरापल्याड, नदीकाठी माझे गाव,
_ रावांना आवडले फार, म्ह्णून माझ्या नावापुढे त्यांचे लागले नाव.

नव्या घरात शोभून दिसतो, डायनिंग टेबल,
_ रावांच्या नावासमोर, माझ्या नावाचे लागले लेबल.

हिरवा चाफा, कमळ निळे,
__ मी सुखी आहे, कारण तुमच्यामुळे.

दोन जीवांचे, जातक जुळले,
_ रावांमुळे सुख काय आहे, ते कळले.

आई-वडिलांचा आशीर्वाद, नाही उणे कशाचे,
__ रावांमुळे आज, दिवस पाहते सुखाचे.

घालते मी शुभप्रभाती, पाणी तुळशीला,
_ रावांनी मला, बायको करून आणली मुळशीला.

हा लाख मोलाचा ऐवज सारा, मी तुमच्या हवाली करते,
__ राव मला नको अजून काहि, मी फक्त तुमच्यावर मरते.

लग्नाचे आहे हे पर्व, संपत्तीचा नसावा गर्व,
__ रावांचे नाव घेते, ऐकताना सर्व???

जन्मात एक झाली, हि प्रितभेट देवा,
_ राव मला साथ जन्मी, तुमचीच पत्नी ठेवा.

स्वप्नात पहिले जे, ते रूप हेच होते,
___ रावांचे नाव आज, सर्वांसमोर घेते.

उंच मनोरे, नव्या जगाचे,
__ रावांमुळे भेटले मला, हे दिवस सुखाचे.

दासांचाही दास श्रीहरी, नंदाचा नंदन,
__ रावांचे नाव घेऊन करते, तुम्हा सर्वांना वंदन.

शब्दही न बोलता, साद घातली कुणी,
__ राव आहेत, माझ्या दिलाचे धनी.

समोर येताच तुमचा चेहरा, बघून काळजाचा चुकतो ठोका,
_ रावांचे सर्वांसमोर नाव घेण्याचा, भेटला आज मोका.

स्त्री शिवाय घराला, नाही कशाचा अर्थ,
_ रावांचे कष्ट मी, जाऊ देणार नाही व्यर्थ.

रंग हे नवे, गंध हे नवे,
__ रावांची साथ, मला ७ जन्मी हवे.

बेसुरी मी, तू सूर माझा,
_ तू आहेस, माझ्या दिलाचा राजा.

७ ला म्हणतात, इंग्रजीमध्ये सेवन,
_ रावांसाठी शिकेन, मी सर्व जेवण.

आई वडिलांपेक्षा, नाही मोठी कोणाची माया,
__ रावांच्या सानिध्यात येऊन, भेटली मला छाया.

सूर्याने दिली साडी, चोळी आणि गोफ,
_ रावांच्या मांडीवर _ घेते झोप.

आंबे वनात, कोकिळा गाते गोड,
__ रावांचे नाव घेते, वैनी वाट माझी सोड.

गळ्यात मंगळसूत्र, हि सौभाग्याची खून,
रावांचे नाव घेते ___ ची सून.

लग्नासाठी मुले पाहिले, सतराशे साठ,
अखेर __ रावांशी बांधली, लग्नाची गाठ.

सासरे आहेत प्रेमळ, सासूबाई आहेत दयाळू,
_ रावांचे नाव घेते, आहेत खूप मायाळू.

गुलाबाचे फुल, गणपती बाप्पाला वाहिले,
_ च्या साठी, गाव पाहिले.

संसाराची सुरवात, सर्वांच्या आशीर्वादाने करेन,
__ रावांचे मी, आजपासून सर्व ऐकेन.

संसारात स्त्रीने, नेहमी रहावे दक्ष,
__ रावांचे नाव घेते, ईकडे द्या लक्ष.

नको मोहन माळ, नको हिऱ्याचा हार,
_ रावांच्या जीवनात, मी सुखी आहे फार.

मंदिराच्या गाभाऱ्यात, विठ्लाची मूर्ती,
__ रावांची होवो, सगळीकडे कीर्ती.

आयुष्यात सु:ख-दुःख, दोन्ही असावे,
__ रावांचे प्रेम, माझ्यावर सदैव असावे.

वडिलांची छाया, आईची माया,
_ रावांच्या सुखासाठी, झिजवते काया.

रात्रीच्या आकाशात, चमचमते तारे,
_ रावांचे नाव घेते, लक्ष द्या सारे.

सोन्याच्या बेसरीत, पाचूचा खडा,
__ राव अन माझा, ७ जन्माचा जोडा.

आमचे लग्न होईल कि नाही, अखेर स्वप्न झाले साकार,
__ रावांनी खूप कष्ट केले, मिळण्यासाठी घरच्यानकडून होकार.

चहा केला नेऊन दिला, दुधाने भरले कप,
__ रावांसाठी केले, ५ वर्ष तप.

आषाढी कार्तिकी, पंढरपूरची वारी,
__ च नाव घेतो, राम कृष्ण हरी.

कस्तुरीचा जन्म, सुगंधाकरिता,
माझे जीवन अर्पण, __ रावांकरिता.

प्रेम काय आहे, हे माहित नव्हते मला,
ते खूप सुंदर आहे, हे _ रावांमुळे कळले मला.

चांदीच्या नक्षीदार ताटाला, सोन्याचा गिलावा,
__ रावांसारखा गुणी पती, जन्मोजन्मी मिळावा.

रखरखत्या वैशाखात, प्रेमाचा धुंद वारा,
जीवनाचा खेळ समजला, __ मुळे सारा.

लक्ष्मी माते वंदन करते, मनी श्रद्धेचे बळ,
__ रावांच्या संसारी दे, समृद्धीचे फळ.

चालली सप्तपदीचे, सात पावले,
_ रावांच्या नावाने, मंगळसूत्र बांधले.

श्लोक रामदासांचे, आहेत किती छान,
__ रावांच्या संसारात, हरवले मी भान.

कपाळावरील कुंकू, मांगल्याची खूण,
__ रावांची आणि माझे, जुळले, ३६ गुण.

उन्हाच्या उकाड्यामुळे, सगळे झाले त्रस्त,
सगळे म्हणतात _ आणि __ ची जोडी आहे जबरदस्त.

लग्नात हुंडा मागून, नाते करू नका घाण,
__ रावांसारखे पती मिळाले, मला फार आहे त्यांचा अभिमान.

दादरला गेलो बांधायला, लग्नाचा बस्ता,
__ रावांचे नाव घेते, आता सोडा माझा रस्ता.

रत्नागिरीला आहे देवस्थान, गणपतीपुळे,
कोकणामध्ये सासर भेटले __ रावांमुळे.

सासू सासऱ्यांच्या छायेत, मला नाही काही कमी,
__ राव हेच माझ्या, सर्वस्वाचे स्वामी.

दारा वरती काढली, लक्ष्मीची पावल,
__ रावांचे साधे रूप, माझ्या मनाला भावल.

काचेच्या पेल्यात, सुख दुःखाचे पेय,
__ रावांना कीर्ती मिळावी, हेच माझे ध्येय.

संगमरवरी देवळात बसविली, साईंची मूर्ती,
__ रावांशी लग्न झाले, झाली इच्छा पूर्ती.

रिम झिम झरती श्रावण धारा, धरतीच्या कलशात,
_ रावांचे नाव घेते, राहुद्या लक्षात.

पंढरीच्या यात्रत, विठ्ठल नामाचे गजर,
__ रावांचे नाव घ्यायला, नेहमी मी हजर.

यमुना नदीवर पडली, ताजमहालाची सावली,
_ रावांची जन्मदाती, धन्य ती माउली.

श्रीविष्णूच्या मस्तकावर, सदैव असतो शेष,
__ रावांचे नाव घेऊन, करते गृहप्रवेश.

सासू सासऱ्यांनी काम केले, एक पून्याचे,
__ रावांना दान दिले, मला जन्माचे.

देवाच्या देवळात, गोड सनई वाजते,
तुमच्या आशीर्वादाने, __ रावांचे नाव, महाराष्ट्रात गाजते.

चांगली पुस्तके आहेत, माणसांचे मित्र,
_ रावांच्या सहवासात रंगविते, संसाराचे चित्र.

मोगऱ्याचा सुगंध घेताना, झाले मी धुंद,
_ रावांचे नाव घ्यायचा, लागला मला छंद.

जडतो तो जीव, लागते ती आस,
__ रावांसोबत सुरु झाला, माझा आयुष्याचा प्रवास.

सातारा म्हंटल कि, फेमस कंदी पेढे,
__ राव झाले, कोल्हापूरच्या पोरी मागे वेडे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *