Skip to content
- पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते,
….. रावांचे नाव घेऊन आशिर्वाद मागते.
- गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं,
….. रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं.
- घातली मी वरमाला हसले …. राव गाली,
थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली.
- वय झाले लग्नाचे लागली प्रेमाची चाहूल,
…. रावांचे जीवनात टाकले मी पाऊल.
- मोह नसावा पैश्याचा, गर्व नसावा रूपाचा,
…. बरोबर संसार करीन सुखाचा.
- चांदीच्या वाटीत साखरेचे खडे,
…. चं नाव घेते देवापुढे.
- गावठी गुलाबाला सुगंध सुवास,
…. रावांना भरवते श्रीखंडपुरीचा घास.
- हळद असते पिवळी, कुंकू असते लाल,
…. रावांची मिळाली साथ झाले जीवन खूशहाल.
- मंगळसुत्राच्या दोन वाट्या सासर आणी माहेर,
…. यांनी केला मला सौभाग्याचा आहेर.
- सासरी आले तरी माहेरचे विसरता येत नाही अंगण,
………. रावांचे नाव घेते सोडते मी कंकण.
- नाव घ्या नाव घ्या म्हणता, नाव तरी काय घ्यायचे,
…….रावांना शेवटी अहोच म्हणायचे.
- कराडला आहे कृष्णा कोयनेचा घाट…. नाव घेते बांधते……… च्या लग्नाची गाठ.
- वाट जीवनाची झाली सुखद आनंदी
…. च्या सवे चालते मी सप्तपदी… !!
- चांदीच्या ताटाभोवती रांगोळी काढली मोरांची,
—– रावांच नाव ऐकायला गर्दी जमली मैत्रिणींची / पाहुण्यांची.
- लग्नाचे बंधन घातले मंगळसूत्र,
……….चे नाव घेऊन आयुष्याचे सुरु झाले नवे सत्र.
- सप्तस्वरांची उधळण गायकाच्या सुरेल गाण्यात
..सप्तरंगाची पखरण..चित्रकाराच्या कुशल कुंचल्यात
..सात जन्माची सुरवात सप्तपदीच्या सातपावलात
.. रावांची पत्नी म्हणून धन्य झाले जगात..!
- हातावरची मेंदी देते आयुष्याला अर्थ नवा,
…. रावांना घास घालायला वेळ कशाला हवा..!
- शेल्या शेल्याची बांधली गाठ,
…….नाव मला तोंडपाठ.
- नव्या नव्या शालुचा पदर सांभाळताना मन माझे भांबावते
….. च्या साथीने नव जीवनाचे स्वप्न मी रंगवते