Skip to content
- सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी,
….. चे नाव घेते, हळदी-कुकुंवाच्या वेळी.
- जात होते फुलांला,पदर अडकला वेलीला, एवढे महत्त्व कशाला
….च्या नावाला.
- लग्नानंतर बदलून चालत नाही नुसतं नाव,बदलावा लागतो स्वभाव,
……….. च्या घरी मिळेल माझ्या कलागुणांना वाव.
- नीलवर्ण आकाशात चंद्रासवे रोहिणी
…..च्या जीवनात….ही गृहिणी.
- अथांग वाहे सागर संथ चालते होडी परमेश्वर सुखी ठेवो
…..नी माझी जोडी.
- नाकात नथ..पायात जोडवी..पैठणी नेसले लक्ष्मीसारखी….कानात कुड्या….हातात पाटल्या..बांगड्यामध्येच किणकिणती….वेणीत खोपा….नऊवारी साडी….कपाळी चंद्रकोर कोरलेली….भांगात कुंकू….हातात तोडे….गळ्यात चंद्रहार मनी शोभतो….साक्षात लक्ष्मीच लक्ष्मीचे स्वागत करते….आणि …. नाव घेऊन लक्ष्मीपूजन करते!
- मोगऱ्याचा सुगंध स्पर्धा करतो निशिगंधाशी,
…….नाव घेते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी