Skip to content
- लग्नाचा वाढदिवस करू साजरा,
…. तुला आणला मोगऱ्याचा गजरा.
- प्रेमाच्या चौकात किती पण फिरा शोधून सापडणार नाही,
…. सारखा हिरा.
- काश्मीरमध्ये म्हणजे भारताचे नंदनवन,
…. च्या साह्याने सुखी झाले जीवन.
- यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवितो बासरी,
…. सोबत सुखी आहे सासरी.
- फुलासंगे मातीस सुवास लागे,
…. रावांचे आणि माझे जन्मोजन्मीचे धागे.
- दही,साखर, तूप,
….. राव मला आवडतात खूप.
- मंद आहे वारा संथ चाले होडी,
परमेश्वर सुखी ठेवो …. आणि माझी जोडी.
- शनिवार-रविवार सुट्टीचा वीकेंड,
…. चं नाव घेते आमच्या प्रेमाला नाही कधी एंड.
- धरला यांनी हात वाटली मला भीती,
हळूच म्हणाले …. राव अशीच असते प्रीती.
- एका वर्षात असतात महिने बारा,
…. च्या नावात समावलाय आनंद सारा.
- यांचं आणि माझं नातं घट्ट आहे,
जसं फेव्हीकॉल आणि ग्लू.
आमच्या अॅनिव्हर्सरीच्या डेट मात्र यांना नसतो क्ल्यू.
- तसा मला काही शौक नाही पाहायचा क्रिकेट,
पण बघता बघता याच्या प्रेमात पडली माझी विकेट.
- सूर हवा तर ताल हवा.. ताल हवा तर सूर हवा.. रावांचे नांव घ्यायला वेळ कशाला हवा…?
- मूकपणे छेडीत होते जीवनवीणेची तार,
….च्या स्पर्शाने उमटले झंकार..!
- पर्जन्याच्या आगमनाने ओलीचिंब होते धरती,
….रावांच्या जीवनरथाची मी झाले सारथी..!
- झाली प्रभात..विहंग उडाले गात,
…. रावांच्या जीवनाला.माझी अखंड लाभो साथ..!