- पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते,
….. रावांचे नाव घेऊन आशिर्वाद मागते. - गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं,
….. रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं. - घातली मी वरमाला हसले …. राव गाली,
थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली. - वय झाले लग्नाचे लागली प्रेमाची चाहूल,
…. रावांचे जीवनात टाकले मी पाऊल. - मोह नसावा पैश्याचा, गर्व नसावा रूपाचा,
…. बरोबर संसार करीन सुखाचा. - चांदीच्या वाटीत साखरेचे खडे,
…. चं नाव घेते देवापुढे. - गावठी गुलाबाला सुगंध सुवास,
…. रावांना भरवते श्रीखंडपुरीचा घास. - हळद असते पिवळी, कुंकू असते लाल,
…. रावांची मिळाली साथ झाले जीवन खूशहाल. - मंगळसुत्राच्या दोन वाट्या सासर आणी माहेर,
…. यांनी केला मला सौभाग्याचा आहेर. - सासरी आले तरी माहेरचे विसरता येत नाही अंगण,
………. रावांचे नाव घेते सोडते मी कंकण. - नाव घ्या नाव घ्या म्हणता, नाव तरी काय घ्यायचे,
…….रावांना शेवटी अहोच म्हणायचे. - कराडला आहे कृष्णा कोयनेचा घाट…. नाव घेते बांधते……… च्या लग्नाची गाठ.
- वाट जीवनाची झाली सुखद आनंदी
…. च्या सवे चालते मी सप्तपदी… !! - चांदीच्या ताटाभोवती रांगोळी काढली मोरांची,
—– रावांच नाव ऐकायला गर्दी जमली मैत्रिणींची / पाहुण्यांची. - लग्नाचे बंधन घातले मंगळसूत्र,
……….चे नाव घेऊन आयुष्याचे सुरु झाले नवे सत्र. - सप्तस्वरांची उधळण गायकाच्या सुरेल गाण्यात
..सप्तरंगाची पखरण..चित्रकाराच्या कुशल कुंचल्यात
..सात जन्माची सुरवात सप्तपदीच्या सातपावलात
.. रावांची पत्नी म्हणून धन्य झाले जगात..! - हातावरची मेंदी देते आयुष्याला अर्थ नवा,
…. रावांना घास घालायला वेळ कशाला हवा..! - शेल्या शेल्याची बांधली गाठ,
…….नाव मला तोंडपाठ. - नव्या नव्या शालुचा पदर सांभाळताना मन माझे भांबावते
….. च्या साथीने नव जीवनाचे स्वप्न मी रंगवते
- लग्नाचा वाढदिवस करू साजरा,
…. तुला आणला मोगऱ्याचा गजरा. - प्रेमाच्या चौकात किती पण फिरा शोधून सापडणार नाही,
…. सारखा हिरा. - काश्मीरमध्ये म्हणजे भारताचे नंदनवन,
…. च्या साह्याने सुखी झाले जीवन. - यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवितो बासरी,
…. सोबत सुखी आहे सासरी. - फुलासंगे मातीस सुवास लागे,
…. रावांचे आणि माझे जन्मोजन्मीचे धागे. - दही,साखर, तूप,
….. राव मला आवडतात खूप. - मंद आहे वारा संथ चाले होडी,
परमेश्वर सुखी ठेवो …. आणि माझी जोडी. - शनिवार-रविवार सुट्टीचा वीकेंड,
…. चं नाव घेते आमच्या प्रेमाला नाही कधी एंड. - धरला यांनी हात वाटली मला भीती,
हळूच म्हणाले …. राव अशीच असते प्रीती. - एका वर्षात असतात महिने बारा,
…. च्या नावात समावलाय आनंद सारा. - यांचं आणि माझं नातं घट्ट आहे,
जसं फेव्हीकॉल आणि ग्लू.
आमच्या अॅनिव्हर्सरीच्या डेट मात्र यांना नसतो क्ल्यू. - तसा मला काही शौक नाही पाहायचा क्रिकेट,
पण बघता बघता याच्या प्रेमात पडली माझी विकेट. - सूर हवा तर ताल हवा.. ताल हवा तर सूर हवा.. रावांचे नांव घ्यायला वेळ कशाला हवा…?
- मूकपणे छेडीत होते जीवनवीणेची तार,
….च्या स्पर्शाने उमटले झंकार..! - पर्जन्याच्या आगमनाने ओलीचिंब होते धरती,
….रावांच्या जीवनरथाची मी झाले सारथी..! - झाली प्रभात..विहंग उडाले गात,
…. रावांच्या जीवनाला.माझी अखंड लाभो साथ..!
पंढरीच्या यात्रेत, विठ्ठल नामाचे गजर,
__ रावांचे नाव घ्यायला, नेहमी मी हजर.
यमुना नदीवर पडली, ताजमहालाची सावली,
_ रावांची जन्मदाती, धन्य ती माउली.
श्रीविष्णूच्या मस्तकावर, सदैव असतो शेष,
__ रावांचे नाव घेऊन, करते गृहप्रवेश.
सासू सासऱ्यांनी काम केले, एक पून्याचे,
__ रावांना दान दिले, मला जन्माचे.
देवाच्या देवळात, गोड सनई वाजते,
तुमच्या आशीर्वादाने, __ रावांचे नाव, महाराष्ट्रात गाजते.
चांगली पुस्तके आहेत, माणसांचे मित्र,
_ रावांच्या सहवासात रंगविते, संसाराचे चित्र.
मोगऱ्याचा सुगंध घेताना, झाले मी धुंद,
_ रावांचे नाव घ्यायचा, लागला मला छंद.
जडतो तो जीव, लागते ती आस,
__ रावांसोबत सुरु झाला, माझा आयुष्याचा प्रवास.
सातारा म्हंटल कि, फेमस कंदी पेढे,
__ राव झाले, कोल्हापूरच्या पोरी मागे वेडे.
नव्हत्या माहित मला, जन्मातरींच्या गाठी,
__ देवाने बनवलंय तुला, माझ्याच साठी.
नवा छंद, नवा ध्यास, शोधी नवे आकाश,
__ रावांमुळे माझ्या, आयुष्यात पडला प्रकाश.
नवा रस्ता शोधू, हातात हात दे,
_ मला अशीच, आयुष्यभर साथ दे.
असंख्य तारे, नभात पहावे निरखून,
_ रावांसारखे पती, वडिलांनी दिले पारखून.
सासरी आहे माझ्या, सुंदर हिरवा मळा,
_ रावांमुळेच लागला मला, त्यांचा लळा.
नाही विचार केला, मी पाहिले न मागे,
__ रावांसोबत जुळले माझे, आयुष्याचे धागे.
शब्द तिथे नाद, कवी तिथे कविता,
_ रावांची जोड जणू, सागर आणि सरिता.
जेवणाला चव यायला, लागते मीठ,
__ दिसते घाबरी, पण आहे खूप धीट.
मुंबई आहे सर्वांच्या, स्वप्नांची नगरी,
मी सुखी आहे कारण, __ राव पडले माझ्या पदरी.
पहिल्या पावसात, मातीचा छान आला सुगंध,
_ राव माझ्या आयुष्यात आल्याने, भेटला मला आनंद.
हाताने करावे काम, मुखाने म्हणावे राम,
__ रावांचे चरण, हेच माझे चारही धाम.
आई वडिलांनी केले संस्कार , शिक्षणाने केले सक्षम,
__ सोबत असताना, संसाराचा पाया होईल भक्कम.
सर्व कार्याचा पाठीराखा, विघ्णहर्ता गणेश,
_ राव हेच माझ्या, जीविताचे परमेश.
कपाळाचे कुंकू, जशी चंद्राची कोर,
_ च्या मदतीवर, सगळा माझा जोर.
दत्ताला प्रिय गाय, महादेवाला प्रिय नंदी,
_ राव आले आयुष्यात, म्हणून आहे मी आनंदी.
देवाला जे मागितले, ते सर्व मिळाले,
खूप खुश आहे आज मी, कारण __ सोबत माझे लग्न जुळाले.
गीतात जसा भाव, फुलांत तसा गंध,
_ रावांबरोबर जुळले, मनाचे रेशमी बंध.
आई बाबांच्या प्रेमापुढे, नाही कोणाची गरज,
__ रावांचे माझ्यावर प्रेम पाहताच, मी त्यांना होकार दिला सहज.