Skip to content
सत्यनारायण पूजा मराठी उखाणे
- पूजेपुढे ठेवल्या फळांच्या राशी
…… रावांचे नाव घेते, सत्यनारायणाच्या दिवशी
- सत्यनारायणाच्या पूजेपुढे मांडले, प्रसादाचे ताट
……यांच्या साथीने मिळाली आयुष्याला नवी वाट
- मंथरेमुळे घडले रामायण,
….. चे नाव घेते आज घरी आहे सत्यनारायण
- ठाण्यातल्या गडकरीला लागलंय मोरूची मावशी
……चे नाव घेते सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी
- चांदीच्या तबकात तुपाच्या फुलवाती
….रावांचे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी
- आजच्या पूजेला फुलांच्या राशी,
…..च नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी
- भिल्लीणीच्या रूपात शंकरापुढे आली गिरीजा
…..च्या सोबत आज पहिली सत्यनारायणाची पूजा
- दारावर लावले झेंडूचे तोरण
…..चे नाव घेते सत्यनारायणाचे कारण
- चांदीच्या ताटात ठेवले लाडू
…..चे नाव घेते सत्यनारायणापुढे
- घरात भरल्या अठरा धान्याच्या राशी
……चं नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी
- आईवडील आहेत प्रेमळ, सासूसासरे आहेत हौशी,
…. चं नाव घेते बारशाच्या दिवशी.
- जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण
…..नाव घेते गृहप्रवेशाचे, मंगळागौरीचे, सत्यनारायणाचे, डोहाळेजेवणाचे, कुठलेही असो कारण.
- ….. सोहळ्याला सर्वजण झाले आनंदाने जॉईन.
…..माझा हीरो मी त्याची हिरॉईन