नववर्षाच्या शुभारंभ करिता येतो पाडवा ;
_____ रावांच्या सहवासात लाभो सदैव गोडवा
श्रावणाच्या हिरव्या साजाने सृष्टी आहे सजली;
_______ रावांच्या सुखासाठी मंगळागौर मी पुजली
श्रावण सरला, वाजत गाजत गणपती आले दारात
_______ रावांचे नाव घेऊन आणते गौरी घरात
तीलगुळाच्या देवघेवीनं दृढ प्रेमाचं जुळतं नातं;
_______ रावांचे नाव घेते आज आहे मकर संक्रांत
रूप गुण संपदेच्या जोडीला हवं चारित्र्य ;
______ रावांच्या नावात आहे पावित्र्य
स्वर्गीय नंदनवनात सोन्याच्या केळी ;
______ रावांचे नाव घेते गौरी पूजनाच्या वेळी
कुबेराच्या भंडारात हिरे- मानकांच्या राशी
_______ रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी
चंद्र मराठीत, चाँद हिंदीत , इंग्रजीत म्हणतात मून
——– रावांचे नाव घेते मी _______ सून
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी,
_______ रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी
महाविष्णूच्या मस्तकावर डोलत असतो शेष
_______ रावांचे नाव घेऊन करते मी गृहप्रवेश
यमुनेच्या डोहात पडे ताजमहालाची सावली ;
______ रावांची आई जशी माझी दुसरी माउली
इंग्रजी भाषेत पाण्याला म्हणतात वॉटर
______ रावांचे नाव घेते, आहेत ते डॉक्टर
घातली मी वरमाळा, _______ रावांच्या गळी
थरथरला माझा हात; चढली लज्जेची लाली