छान छान मराठी उखाणे

दही, दूध, तूप आणि लोणी…
…….. रावांचे नाव घेते मी त्यांची राणी

मित्र-मैत्रीणीच्या मेळ्यात हास्याला येत उधाण,
शब्दांचे सुटतात बाण, जीव होतो हैराण
पण हळुच सांगते कानात,
…….. राव आहेत माझे जीव की प्राण.

सोन्याच्या ताटात खडीसाखरेची वाटी,
…….. रावांचा नाव घेते सात जन्मासाठी

आभाळ भरले चांदण्यांनी, चंद्र मात्र एक
…….. रावांचे नाव घेते …….. ची लेक

पाच वर्षांचा संसार पण प्रत्येक दिवस गोड,
तिन्ही सांजेला मनाला लागे …….. रावांची ओढ.

एका वर्षात महिने असतात बारा,
…….. रावांच्या नावातच सामावलं आहे आनंद माझा सारा.

बसली होती दारात, नजर गेली आकाशात ……..
…….. रावांचा फोटो माझ्या भारताच्या नकाशात

रिम झिम झरती श्रावण धारा धरतीच्या कलशात
…….. रावांचे नाव घेते राहू द्या लक्षात.

प्रसंगानुरूप येते परमेश्वराची आठवण
…….. रावांच्या हृदयात अमृताची साठवण

तुळशीची करते पूजा, शंकराची करते आराधना
…….. रावांना दीर्घायुष्य लाभो हीच परमेश्वराला प्राथर्ना.

मंगल दिनी मंगल कार्याला आंब्याच्या पानांचा बांधतात तोरण
…….. रावांचे नाव घायला …….. च कारण

तांब्याच्या पळीवर नागाची खून,
…….. रावांचा नाव घेते…….. ची सून.

आई वडीलांच्या वियोगाचे दुःख ठेवून मनात..
हसतमुखाने प्रवेश केला मी …….. रावांच्या जीवनात.

नीलवरणी आकाशात शोभते चंद्राची कोर
…….. राव सारखे पती मिळाला भाग्य लागतं थोर.

बकुळीची फुले सुकली तरी हरवत नाही गंध ……..
…….. रावासाठी माहेर सोडले तरी राहतील मनात स्म्रुतिबंध

पेटी वाजे तबला वाजे मंजुळ वाजे बासरी
…….. रावांच्या सप्तसुरांना साथ मिळाली हसरी

तिरंगी झेंड्यावर अशोकचक्राची खूण,
…….. नाव घेते …….. ची सून

बागेत फूल गुलाबाचे
माझ्या मनात नाव …….. रावांचे .

दिन दुबळ्याचे गहाणे परमेश्वराने ऐकावे
…….. रावानं सारखे पती मिळाले आणखी काय मागावे

एक दिवस अचानक आला एक घोडेस्वार
श्वेत रंगी घोड्यावर …….. रावच होते ते जादूगार

सुंदर माझे घर त्यात …….. रावांचा मधुर स्वर
दोघे मिळून फुलवतोय संसाराचा भरभरुन बहर.

सत्यावनासाठी सवित्रिने यमाचा पुरविला पिच्छा,
सात जन्म …….. राव माझे पति राहो हीच माझी इच्छा.

खाण तशी माती …….. राव माझे पती
आणि मी त्यांची सौभाग्यवती

सागरात सरिता जीवनात ज्योती
…….. राव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती

लहान मुले असतात खुप गोजिरवाणी,
…….. राव माझे संग्राम अन मि त्यांची देवयानी

गुलाबाचे फुल मधोमध असते पिवळे,
…….. राव दिसतात कृष्णा सारखे सावळे

येत होती जात होती, घडाळ्यात पाहत होती,
घडाळ्यात वाजले एक …….. रावांचे नाव घेते …….. ची लेक.

आपुलकी असेल तर जीवन सुदंर
संदेशाची आवड असेल तर मोबाइल सुंदर
फुले असेल तर बाग सुंदर
गालातल्या गालात एक छोटस हसु असेल तर चेहरा सुंदर
…….. रावांनबरोबर च सगळी नाती मनापासुन जपते म्हणुन सासर सुंदर

लेक लाडकी कुणाची, आईबापाची
सुन कुणाची, सासू सासरे ची
राणी कुणाची …….. रावांची

साजुक तुपाच्या करते पुरया, टाकते पाट करते ताट
…….. राव बसले जेवायला समया लावते तिनशे साठ

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *