जुन्या आठवणी छळत राहिल्या रात्र भर
मी चांदण्या मोजून पाहिल्या रात्र भर
तो किनारा मुळी नव्हता कुणा निराळा
मी लाटांच्या ओव्या ऐकल्या रात्र भर
वाटले रात्र साथ देईल पुन्हा एकदा
मी ओंजळी चंद्रास वाहिल्या रात्र भर
त्यांच्या सुंदरतेची सर नव्हती कश्यास
स्वर्गाच्या पऱ्या स्वप्नी दिसल्या रात्र भर
उगा कधी एक एक तारे मोजताना
‘प्रति’ तुझ्यावरच कविता लिहिल्या रात्र भर
©प्रतिक सोमवंशी