कर सर्वशक्तीनीशी प्रहार नियती
प्रतिकार करण्यास आता तयार मी
पराजीत परतशील हा शब्द माझा
लावलीस पणाला जरी सर्व माया

बाहुले तुझ्या हातातले; भ्रम तुझा
गुलाम तुझ्या मर्जीचे; गैरसमज तुझा
समयचक्राच्या कैदेची तु ही कैदी
अजून किती वेळ छळशील मला

संधी मीच नेहमी देत राहिलो तुला
गैरफायदा त्याचाच तु नेहमी उचलला
पण पुरे झाले; आता पुनः संधी देणार नाही
तुझी दखल आता मी खपवून घेणार नाही

नव्याने लिहावे लागले तरी पुनः लिहेन
आयुष्याचे प्रत्येक पान नव्याने रंगवेन
इच्छा तुझी मला हारताना बघण्याची
इच्छाच राहील कधीही न पूर्ण होणारी

© अक्षय समेल

Loading

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *