ज्ञानी माणसानं

आत्यंतिक प्रेम करावं असं काही
कुणाला आढळलं की नेमकं
उध्वस्त करणारच काही त्याला
सापडलेलं आहे हे सत्य
निष्पाप माणसाला सांगायच नाही असा
ज्ञानी माणसानं निर्धार करायचा
आणि असाही की जे अटळच आहे ते
आपल्यामुळे लवकर न येतो,
जे अटळच आहे त्याला
पूर्वतयारीशिवाय
निर्णायकपणे भिडण्याची कुणाची संधी
लांबणीवर न पडो…
ज्ञानी होण्याची सनद
इतरानांही मिळो –
जळत जळत सारे त्यांना(ही)
कळत जावो…

~ द. भा. धामणस्कर

Loading

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *