उशीरा पोहोचलेल्या कविता,
थोड़या शिळ्या झालेल्या कविता
ज़ून्या डायरीतल्या एखाद्या
निखळलेल्या पानावरच्या कविता
सोनेरी उन्हासारख्या ऊबदार कविता,
काही थन्ड चान्दण्यात गोठलेल्या,
काही योध्यांच्या रंजक शौर्या गाथा,
धारदार शब्दान्च्या बाणावर खोचलेल्या
कधी खोलात शिरणार्या,
कधी अलगद तरंगनर्या
कधी सैलावलेल्या मिठीत धून्द
अलवार ओल्या हळदीत भिजणार्या…
एकतर्फी प्रेमसारख्या काही निनावी
कधी लाल, हिरव्याकन्च, काही गुलाबी
ऱक्ताने लिहीलेलया, रक्तबंबाळ करणार्या
गारूड़ करनर्या काही, नशील्या अन शराबी
काहीही म्हणा, कशाही असू दया
भावनांचया सागर मन्थनानन्तर
निवांत जन्मनार्या, हळूवार फूलणार्या,
उशीरा पोहोचलेल्या कविता,
थोड़या शिळ्या झालेल्या कविता
-स्वप्नाली