कमी तापवलं तर
नासण्याची भीती
जास्त तापवलं तर
आलेल्या दाट सायीमुळे
गुदमर होतो आयुष्याचा
विस्तवावरच ठेवलं तर
राखेशिवाय काय सापडेल?
या त्रैराशीकाच्या गोंधळात
गणित चुकलेल्या विद्यार्थ्याने
छडी खाण्यासाठी
डोळे मिटून हात पुढे करावा
तसा मी उभा आहे
पाच फूट सहा इंचाच्या बाकावर
“तूर्तास”, दासू वैद्य