तु माझ्या
डोळयाची गं पापणी…
तु माझ्या
डोळयातलं गं पाणी…
तु आहेस
लांब तरी…
माझ्या ओठांवरी
हसरी…
तु गेली रानांवनां
उन्हं डोक्यावं घेऊनं…
मझं सांगुनी बरसं काही
संध्या घेऊनं लवकर येईनं…
मी नाही शिकले गं फार
आहे अडाणी भोपळा
पणं तु फार शिकं
आहे आभाळ तुझ्या जोडीला
आई तुझे सल्ले
का ? आठवतात मला बार-बार
तु नाही जवळी
पणं होई तुझा भास…
आठवते तुझा चेहरा,
तुझे ते निरागस,
क्षीण झालेले डोळे
ज्या डोळ्यांनी आयुष्यभर साठवली
बरीचशी स्वप्ने…
मला व्हायचयं
तुझ्या सारखं घट्ट…
माझा पुरविला
प्रत्येक हट्ट…
सगळ्यांसाठी माझा जन्म
झाला विकार
पणं तु धरलं मला
तुझ्या काळजांच्या पास
माय तुझे माझ्यांवर
फार उपकार
सांग कसे फेडू माझ्या
कातडयांची साल
तु आहेस तरी कोण गं ?
करती घरांसाठी
स्वःताच्या हाडांची काडं
तरी सांभाळते समद्या संसाराचा भारं
तु तर आहे
माझ्या घराची शोभा
तुझ्याविना प्रत्येक कोपरा
लागे सुना-सुना…
तु माझ्या घरांचा
आधारस्तंभ गं
तुझ्याविना समद्यांची
मोडते कंबर
मलाही बनायचयं
तुझ्यासारखं निर्भीड
तुझ्या नाही,नि कोणाच्या नाही
मला जगायचयं माझ्या नावानं गं
मला सांगना मंत्र काही
घेईन मी आकाशी भरारी
त्या भरारीला नसेल
कुणाचं आंदण,
तुझीचं आहे ना गं मी सावली पणं का नाही
तुझ्यासारखी निर्भीड
या जगाच्या नजरांना
घाबरते मी लपून
पावसाळा जाई
नि उन्हाळा येई…
पणं नाही हात
थांबला अजून…
संध्या येई
निजलेसी तु
तेव्हा होई
तुझा आत्मा शांत
ईश्वरी मागणं
मागते मी बार-बार
तुझ्याचं पोटी जन्म
घ्यायचायं मला बार-बार
- कोमल जगताप