प्रेम माझं आहे स्वतःवर
प्रेम माझं आहे या विश्वावर
प्रेम माझं आहे या जीवनांवर
प्रेम माझं आहे या मरणावर
प्रेम माझं आहे स्व:ताच्या असण्यांवर
प्रेम माझं आहे स्व:ताच्या नसण्यांवर
प्रेम माझं झाडांवर
प्रेम माझं पक्ष्यावर
प्रेम माझं आकाशावर
प्रेम माझं आकाशातल्या चांदण्यावर
प्रेम माझं माझ्या या माणसांवर
प्रेम माझं माझ्या या माणसाच्या माणूसकींवर
प्रेम माझं माझ्या या गीतावर
प्रेम माझं माझ्या या आकाशी उडणाऱ्या स्वप्नांवर
प्रेम माझं समुद्रावर
प्रेम माझं समुद्राच्या लाटांवर
प्रेम माझं समुद्राच्या काठावर
प्रेम माझं समुद्रातील माश्यांवर
प्रेम, प्रेम, प्रेम
प्रेम माझं साऱ्यांवर
आभाळातील ढगांवर
पावसातील थेंबावर
आयुष्यातील क्षणांवर
आयुष्यातील दु:खावर
आयुष्यातील सुखावर
– कोमल जगताप