संभ्रम

अरण्य असे चुपचाप एखाद्या झाडाचे
एक पानही हालत नाही कधीपासून.
माही पक्षी झाडावर एकही.
ही खरे झाडे आहेत ना ?
की चिंतेचं आहेत ही झाडांची
जमिनीत पुरून ठेवलेली ?
सारेच कसे थबकले जागीच ?
नदी वाहावी या झाडांमधून, डोंगरांमधून
आणि तिने
साधी पहाडी धूनही गुणगुणू नये ?
आकाश मोकळे असावे आणि ते
कुठल्याच पक्षाला कळू नये !
ही नदी, हे आकाश खरी आहेत ना ?

“बरेच काही उगवून आलेले “, द भा धामणस्कर

Loading

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *