ओढ मराठी कविता

ओढ असते या क्षणाला
भिरभिरावे पुन्हा: एकदा फुलपाखरू होऊन…

ओढ असते या पाखरांला
जावे फुलांमध्ये रमून…

विटून जातो हा क्षण
पुन्हा: येरझाऱ्या मारून…

घेऊन बसतो जवळ
दु:खाला कवटाळून…

हा असा खेळ आयुष्याचा
मुसाफिर एक वाटा अनेक…

गुंतून सारा संसार चाले
म्हणून क्षणाला पडते कोडे…

       - कोमल जगताप

Loading

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *