पानगळीच्या, पार मळून गेलेल्या अरण्यातही
एखादा स्वच्छ जांभळा रंग झळाळत जावा तशी ती
नाक्यावरील आमच्या मलिन घोळक्यामधून
लक्ष वेधीत पलीकडे जाते . . .
मी पाहतोय :
हळूहळू ती दृष्टीआड होताना तिच्या
दुपट्ट्याची टोके मोराच्या पंखांसारखी हालताना,
तिची छाती मोरासारखी पुढे झुकताना, आणि पाय
अगदी मोरासारखेच
मागे राहताना . . .
भरून आलेले आकाश
द. भा. धामणस्कर