Uncategorized Archives - Kavita https://www.marathit.com/kavita/category/uncategorized/ Marathi Kavita Fri, 22 Dec 2023 15:22:50 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 https://www.marathit.com/kavita/wp-content/uploads/2023/03/FAV.png Uncategorized Archives - Kavita https://www.marathit.com/kavita/category/uncategorized/ 32 32 पावसाचा गांडुपणा https://www.marathit.com/kavita/%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a4%a3%e0%a4%be/ https://www.marathit.com/kavita/%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a4%a3%e0%a4%be/#respond Fri, 22 Dec 2023 15:22:49 +0000 https://www.marathit.com/kavita/?p=147 वास्तविकतेच्या भयाण जंगलात,एखाद्या झाडाच्या आडोश्याला…पाऊस झेलत पडलेल्या दगडातुनकुणीतरी मूर्ती कोरून गेलेलं…शिरावर कोसळणाऱ्या पाऊसधारा झेलतया हिंस्त्र श्वापदांच्या किंकळ्यांनी भरलेल्या जंगलाततिच्या गुप्तांगामधून आता शेवाळ जन्म घेतयती मूर्ती

The post पावसाचा गांडुपणा appeared first on Kavita.

]]>
वास्तविकतेच्या भयाण जंगलात,
एखाद्या झाडाच्या आडोश्याला…
पाऊस झेलत पडलेल्या दगडातुन
कुणीतरी मूर्ती कोरून गेलेलं…
शिरावर कोसळणाऱ्या पाऊसधारा झेलत
या हिंस्त्र श्वापदांच्या किंकळ्यांनी भरलेल्या जंगलात
तिच्या गुप्तांगामधून आता शेवाळ जन्म घेतय
ती मूर्ती असली तरी जननी आहे
तिच्या ओल्या अंगावरून कित्येक वेलींना मार्ग मिळतो
तिच्या स्तनांवरून टपकणारा पावसाचा प्रत्येक थेंब
तिच्या बाटलेल्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करतो
तिला नाही माहीत कुठला विटाळ, कुठला रोग
कुठला दोष, अन कुठले हेवेदावे
तरी हा जालीम पाऊस रोज येऊन भिजवून जातो
रोज तिच्या त्वचेच्या कित्येक छोट्या छोट्या ठिकऱ्या उडवून जातो
तिच्या शरीरावर आता उठावांपेक्षा चिराच जास्त दिसत आहेत,
काय म्हणावं या पावसाला, “बलात्कारी”
हाच पाऊस मला पण भिजवतोय
एक एक थेंब मनात विद्रोह करून जातोय
“मला तर त्याच्या गांडुपणा वर किळस यायला लागलीय आता” .
©प्रतिक सोमवंशी

Loading

The post पावसाचा गांडुपणा appeared first on Kavita.

]]>
https://www.marathit.com/kavita/%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a4%a3%e0%a4%be/feed/ 0
मी चांदण्या मोजून पाहिल्या रात्र भर https://www.marathit.com/kavita/%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d/ https://www.marathit.com/kavita/%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d/#respond Fri, 22 Dec 2023 15:21:34 +0000 https://www.marathit.com/kavita/?p=145 जुन्या आठवणी छळत राहिल्या रात्र भरमी चांदण्या मोजून पाहिल्या रात्र भर तो किनारा मुळी नव्हता कुणा निराळामी लाटांच्या ओव्या ऐकल्या रात्र भर वाटले रात्र साथ

The post मी चांदण्या मोजून पाहिल्या रात्र भर appeared first on Kavita.

]]>
जुन्या आठवणी छळत राहिल्या रात्र भर
मी चांदण्या मोजून पाहिल्या रात्र भर

तो किनारा मुळी नव्हता कुणा निराळा
मी लाटांच्या ओव्या ऐकल्या रात्र भर

वाटले रात्र साथ देईल पुन्हा एकदा
मी ओंजळी चंद्रास वाहिल्या रात्र भर

त्यांच्या सुंदरतेची सर नव्हती कश्यास
स्वर्गाच्या पऱ्या स्वप्नी दिसल्या रात्र भर

उगा कधी एक एक तारे मोजताना
‘प्रति’ तुझ्यावरच कविता लिहिल्या रात्र भर
©प्रतिक सोमवंशी

Loading

The post मी चांदण्या मोजून पाहिल्या रात्र भर appeared first on Kavita.

]]>
https://www.marathit.com/kavita/%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d/feed/ 0
आवाज https://www.marathit.com/kavita/%e0%a4%86%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9c/ https://www.marathit.com/kavita/%e0%a4%86%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9c/#respond Fri, 22 Dec 2023 15:21:03 +0000 https://www.marathit.com/kavita/?p=143 कसला आवाज आहे हा?इतका गेहरा, इतका शहारलेलाअंधारच्या गर्तेतून उगम पावणाऱ्याएखाद्या नदीच्या शांततेसारखात्या अंधारात,त्या शुकशुकाटात,त्या आवाजाला,घाबरून पळून जावं, की तिथेच थांबावंनिश्चल,ठाम,सगळ काही ऐकत,आपण सोबत घेतलेल्या श्वासांचा

The post आवाज appeared first on Kavita.

]]>
कसला आवाज आहे हा?
इतका गेहरा, इतका शहारलेला
अंधारच्या गर्तेतून उगम पावणाऱ्या
एखाद्या नदीच्या शांततेसारखा
त्या अंधारात,
त्या शुकशुकाटात,
त्या आवाजाला,
घाबरून पळून जावं, की तिथेच थांबावं
निश्चल,
ठाम,
सगळ काही ऐकत,
आपण सोबत घेतलेल्या श्वासांचा आवाजही असाच काहीसा होता ना
घाबरू नकोस, पळू नकोस
तू ही ऐकून बघ, तुलाही जाणवेल
©प्रतिक सोमवंशी

Loading

0
1

The post आवाज appeared first on Kavita.

]]>
https://www.marathit.com/kavita/%e0%a4%86%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9c/feed/ 0
आठवांच्या जखमा https://www.marathit.com/kavita/%e0%a4%86%e0%a4%a0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a4%96%e0%a4%ae%e0%a4%be/ https://www.marathit.com/kavita/%e0%a4%86%e0%a4%a0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a4%96%e0%a4%ae%e0%a4%be/#respond Fri, 22 Dec 2023 15:20:24 +0000 https://www.marathit.com/kavita/?p=141 रस्त्याने जाताना एक काटा रुततोमग तेच भळभळणार रक्तछे, रक्त कसल माझ्या कविता त्याकाही मतले चपलीला चिकटतातकाही चारोळ्या पायात राहून जातातकाही रस्त्यावर नंगा नाच करू पाहतातकाही

The post आठवांच्या जखमा appeared first on Kavita.

]]>
रस्त्याने जाताना एक काटा रुततो
मग तेच भळभळणार रक्त
छे, रक्त कसल माझ्या कविता त्या
काही मतले चपलीला चिकटतात
काही चारोळ्या पायात राहून जातात
काही रस्त्यावर नंगा नाच करू पाहतात
काही काट्याला बिलगून आभारही मानतात
काही ओळी ते रक्त गोठवायचा प्रयत्नही करतात
त्या साचलेल्या, अडगळीतल्या, निर्जीव,
नसांच्या बेड्यात जखडून ठेवलेल्या कवितांना
एकदाच स्वतंत्र मिळतच
आणि राहून जाते ती त्यांच्या आठवांची जखम
©प्रतीक सोमवंशी

Loading

0
1

The post आठवांच्या जखमा appeared first on Kavita.

]]>
https://www.marathit.com/kavita/%e0%a4%86%e0%a4%a0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a4%96%e0%a4%ae%e0%a4%be/feed/ 0
काळरात्र https://www.marathit.com/kavita/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0/ https://www.marathit.com/kavita/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0/#respond Fri, 22 Dec 2023 15:18:51 +0000 https://www.marathit.com/kavita/?p=137 दररोज अंगवळणी असले तरीएखादी पायरी एखाद्या वेळी चुकते मग चुकत जातात हळूहळूशंका कुशंकांची त्रिकोणेआणि आपला शोध फिरत राहतोगोल गोल, गोल गरगरीत वर्तुळाच्या परिघावरमाणसं येतात, स्पर्शून

The post काळरात्र appeared first on Kavita.

]]>
दररोज अंगवळणी असले तरी
एखादी पायरी एखाद्या वेळी चुकते

मग चुकत जातात हळूहळू
शंका कुशंकांची त्रिकोणे
आणि आपला शोध फिरत राहतो
गोल गोल, गोल गरगरीत वर्तुळाच्या परिघावर
माणसं येतात, स्पर्शून जातात
स्पर्शिकां सारखी, वर्तुळ भेदू शकत नाहीत
आपण आतच अडकून पडतो
चक्रव्यूहात…अभिमन्यू बनून

गावात प्रेमाचा पूर येतो, कविता वाहतात
गाव उध्वस्त होते, पूर ओसरून जातो
मागे उरतो, तो फक्त आठवांचा चिखल
गावात पसरलेला भावनांचा कुबट वास
विश्वासाच्या उडालेल्या चिंधड्या चिटकून
राहतात प्लास्टिक सारख्या…बाभळीला

कॅफिन, निकोटिन, मोर्फीन,
भरत जातो साठा शरीरामध्ये
डोपामाईन, अड्रेनलिन, चे झरे
मिसळून जातात रक्ताच्या नद्यांमध्ये
हळूहळू गोठत जातात नद्या
ओसाड पडू लागतात त्यांचे किनारे
वाळवंट…समुद्राला मिळण्यापूर्वीच

रात्री भयाण वाटू लागतात, तारे भेसूर
हवा वाहत राहते दूरवरचे अणुकीरण घेऊन
श्वापदांचा भेसूर आवाज,
घड्याळाची भेसूर टिकटिक
रातकिड्यांची भेसूर किरकिर
ऐकावी लागणार आहे….बहिरे होण्यापूर्वी

गळ्याला पडलेली कोरड, दुष्काळासारखी
अंगावर फणफणणारे शहारे, सापसारखे
पापण्यांवर पडलेला भार, गंजल्यासारखा
आत चाललेला कालवा, अंत्ययात्रेसारखा
हे ओसाडपण थांबवायला हव…मरणापूर्वी

पायरी नको चुकायला पुन्हा
नको पुन्हा तो चक्रव्यूह
नको तसली स्वप्न
नको झोप!
©प्रतिक सोमवंशी

Loading

The post काळरात्र appeared first on Kavita.

]]>
https://www.marathit.com/kavita/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0/feed/ 0
पुष्पक विमान https://www.marathit.com/kavita/%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%95-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8/ https://www.marathit.com/kavita/%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%95-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8/#respond Fri, 22 Dec 2023 15:17:41 +0000 https://www.marathit.com/kavita/?p=135 कवितेला पण असते का स्वतःचे असे भावविश्वकी केवळ कवीच्या भावविश्वातच रममाण होते तीपण भासते प्रत्येक वेळी वेगळीच आवर्तनागणिकदिसतात तिचेही अनेक कंगोरे मनुष्य स्वभावाप्रमाणेखरेच तिच्यात असतात

The post पुष्पक विमान appeared first on Kavita.

]]>
कवितेला पण असते का स्वतःचे असे भावविश्व
की केवळ कवीच्या भावविश्वातच रममाण होते ती
पण भासते प्रत्येक वेळी वेगळीच आवर्तनागणिक
दिसतात तिचेही अनेक कंगोरे मनुष्य स्वभावाप्रमाणे
खरेच तिच्यात असतात का इतके अर्थ दडलेले
खरेच वसली आहे का चराचरात अनेक रूपात
की इथेपण तिच्यात जो तों शोधतोय स्वतःलाच
आणि देतोय तिलासुद्धा नश्वर मनुष्य जन्म
जसा निर्गुणाला फक्त मनुष्य रूपात बांधल्या प्रमाणे
ते काहीही असो,
आपण किमान एकाशी तरी भावरूप होणे गरजेचे
मग गवसेल ज्याचे त्याला स्वतःचेच पुष्पक विमान

– रोहन.

Loading

The post पुष्पक विमान appeared first on Kavita.

]]>
https://www.marathit.com/kavita/%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%95-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8/feed/ 0
माय मराठी https://www.marathit.com/kavita/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80/ https://www.marathit.com/kavita/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80/#respond Fri, 31 Mar 2023 05:06:04 +0000 https://www.marathit.com/kavita/?p=12 वास्त्यल्याचा ठेवा, जरा जपूनी ठेवा…माझ्या मराठीचा गर्व, अभिमानाने फुलवा…धन्य माझी माय माऊली, जिने मला पोसिले…गौरव माझ्या मराठीचा, साऱ्या महाराष्ट्राने जाणिले…मानतो माय माऊली, अशी माझ्या मराठीची

The post माय मराठी appeared first on Kavita.

]]>
वास्त्यल्याचा ठेवा, जरा जपूनी ठेवा…
माझ्या मराठीचा गर्व, अभिमानाने फुलवा…
धन्य माझी माय माऊली, जिने मला पोसिले…
गौरव माझ्या मराठीचा, साऱ्या महाराष्ट्राने जाणिले…
मानतो माय माऊली, अशी माझ्या मराठीची बोली…
रसभरी, मधुभरी वाणी, माझी माय मराठी गायली…
सदैव राहील प्रेम आमुचे, माझींया माऊलीवरती…
सर्वोच्च शिखर गाठील, माझी माय मराठी एकेदिवशी…
गौरवाने गातो गीत माझ्या मराठीचे…
मधूर वाणी लाभली आम्हांस भाग्य माझ्या मानव जातीचे…
जन्मापासूनी नाळ जोडली, माझी माझ्या या मातीशी…
घेऊन जाईल तुझं शिखरावर आज देतो मी वचन तुला…
तुझ्याचं गर्भात रचिला मी माझ्या आयुष्याचा ठेवा…
माझ्या मराठीचा गर्व, अभिमानाने फुलवा…
माझ्या मराठीचा वारसा देतो तान्हुल्या भातुकलीच्या हाता…
जोपासा माझ्या माऊलीला जिने गौरविल्या, घडविल्या लाख लाख पिढ्या…
ज्या कुशीत विसावला साऱ्या मानवतेचा ठेवा…
वास्त्यल्याचा ठेवा, जरा जपूनी ठेवा…
माझ्या मराठीचा गर्व, अभिमानाने फुलवा…
माझ्या मराठीचा गर्व, अभिमानाने फुलवा, अभिमानाने फुलवा….

  • कोमल जगताप

Loading

The post माय मराठी appeared first on Kavita.

]]>
https://www.marathit.com/kavita/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80/feed/ 0