Others Archives - Kavita https://www.marathit.com/kavita/category/others/ Marathi Kavita Fri, 22 Dec 2023 15:19:39 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 https://www.marathit.com/kavita/wp-content/uploads/2023/03/FAV.png Others Archives - Kavita https://www.marathit.com/kavita/category/others/ 32 32 मृत्यू https://www.marathit.com/kavita/%e0%a4%ae%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%82/ https://www.marathit.com/kavita/%e0%a4%ae%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%82/#respond Fri, 22 Dec 2023 15:19:38 +0000 https://www.marathit.com/kavita/?p=139 जमीन मुकी झालीयशुष्क फांद्यांवर दुःखी झालेलीपाखरे गप्प सगळं ऐकतायरात्रीच्या नग्न शरीरावरझोपेचे उलटे प्याले सांडतायमेलेल्या मुडद्यांचा वासफुलांच्या बगिच्यात पसरलायमृत्यू दात विचकतेय वस्त्यांमधूनसमुद्र बघतोय सर्व किनाऱ्यावरूनम्हतारी खिडकीतून

The post मृत्यू appeared first on Kavita.

]]>
जमीन मुकी झालीय
शुष्क फांद्यांवर दुःखी झालेली
पाखरे गप्प सगळं ऐकताय
रात्रीच्या नग्न शरीरावर
झोपेचे उलटे प्याले सांडताय
मेलेल्या मुडद्यांचा वास
फुलांच्या बगिच्यात पसरलाय
मृत्यू दात विचकतेय वस्त्यांमधून
समुद्र बघतोय सर्व किनाऱ्यावरून
म्हतारी खिडकीतून ओरडतेय
तिला कुठला धर्म लगाम घालेल आता?
कोणत वरदान गळा घोटेल तिचा?
त्या म्हतारीला सांगा
तिचा रोल संपलाय
आता पडदा पडेल
नाटक संपल
पण
खिडकीबाहेर मृत्यू तसाच फिरतोय!
©प्रतिक सोमवंशी

Loading

The post मृत्यू appeared first on Kavita.

]]>
https://www.marathit.com/kavita/%e0%a4%ae%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%82/feed/ 0
शल्य https://www.marathit.com/kavita/%e0%a4%b6%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af/ https://www.marathit.com/kavita/%e0%a4%b6%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af/#respond Fri, 22 Dec 2023 15:15:06 +0000 https://www.marathit.com/kavita/?p=133 हेरुनि वर्म सारे, का घाव झाले नेमकेआसवांविना दु:ख ते अजून झाले पोरके ताणल्या स्मितातुनी, हास्य सारी खुणावतीचंद्रास ग्रासण्या छाया का पुढे सरसावती भव्य प्रासादातुनी, सुखे

The post शल्य appeared first on Kavita.

]]>
हेरुनि वर्म सारे, का घाव झाले नेमके
आसवांविना दु:ख ते अजून झाले पोरके

ताणल्या स्मितातुनी, हास्य सारी खुणावती
चंद्रास ग्रासण्या छाया का पुढे सरसावती

भव्य प्रासादातुनी, सुखे सारी बोलावती
बंधण्या विहंग पिंजरी पाश का सरसावती

जरतारी वस्त्रांतुनी, सौख्य कशी वेडावती
सांधण्या जखमा उरिच्या शेले थिटे का पडती

भव्य सारी जीवने अन्‌ भव्य सारे सोहळे
शाप अभावाचा का शून्याच्याच भाळी पडे

’राहत’ शल्यात लघुत्वाच्या विश्व देवकणी वसे
कालपटाचे सहप्रवासी का रडे का हसे

– राहत

Loading

The post शल्य appeared first on Kavita.

]]>
https://www.marathit.com/kavita/%e0%a4%b6%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af/feed/ 0
उशीरा पोहोचलेल्या कविता https://www.marathit.com/kavita/%e0%a4%89%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be/ https://www.marathit.com/kavita/%e0%a4%89%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be/#respond Fri, 22 Dec 2023 15:13:49 +0000 https://www.marathit.com/kavita/?p=131 उशीरा पोहोचलेल्या कविता,थोड़या शिळ्या झालेल्या कविताज़ून्या डायरीतल्या एखाद्यानिखळलेल्या पानावरच्या कविता सोनेरी उन्हासारख्या ऊबदार कविता,काही थन्ड चान्दण्यात गोठलेल्या,काही योध्यांच्या रंजक शौर्या गाथा,धारदार शब्दान्च्या बाणावर खोचलेल्या कधी

The post उशीरा पोहोचलेल्या कविता appeared first on Kavita.

]]>
उशीरा पोहोचलेल्या कविता,
थोड़या शिळ्या झालेल्या कविता
ज़ून्या डायरीतल्या एखाद्या
निखळलेल्या पानावरच्या कविता

सोनेरी उन्हासारख्या ऊबदार कविता,
काही थन्ड चान्दण्यात गोठलेल्या,
काही योध्यांच्या रंजक शौर्या गाथा,
धारदार शब्दान्च्या बाणावर खोचलेल्या

कधी खोलात शिरणार्या,
कधी अलगद तरंगनर्या
कधी सैलावलेल्या मिठीत धून्द
अलवार ओल्या हळदीत भिजणार्या…

एकतर्फी प्रेमसारख्या काही निनावी
कधी लाल, हिरव्याकन्च, काही गुलाबी
ऱक्ताने लिहीलेलया, रक्तबंबाळ करणार्या
गारूड़ करनर्या काही, नशील्या अन शराबी

काहीही म्हणा, कशाही असू दया
भावनांचया सागर मन्थनानन्तर
निवांत जन्मनार्या, हळूवार फूलणार्या,
उशीरा पोहोचलेल्या कविता,
थोड़या शिळ्या झालेल्या कविता

-स्वप्नाली

Loading

The post उशीरा पोहोचलेल्या कविता appeared first on Kavita.

]]>
https://www.marathit.com/kavita/%e0%a4%89%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be/feed/ 0
प्रतिकार https://www.marathit.com/kavita/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0/ https://www.marathit.com/kavita/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0/#respond Fri, 22 Dec 2023 15:12:56 +0000 https://www.marathit.com/kavita/?p=129 कर सर्वशक्तीनीशी प्रहार नियतीप्रतिकार करण्यास आता तयार मीपराजीत परतशील हा शब्द माझालावलीस पणाला जरी सर्व माया बाहुले तुझ्या हातातले; भ्रम तुझागुलाम तुझ्या मर्जीचे; गैरसमज तुझासमयचक्राच्या

The post प्रतिकार appeared first on Kavita.

]]>
कर सर्वशक्तीनीशी प्रहार नियती
प्रतिकार करण्यास आता तयार मी
पराजीत परतशील हा शब्द माझा
लावलीस पणाला जरी सर्व माया

बाहुले तुझ्या हातातले; भ्रम तुझा
गुलाम तुझ्या मर्जीचे; गैरसमज तुझा
समयचक्राच्या कैदेची तु ही कैदी
अजून किती वेळ छळशील मला

संधी मीच नेहमी देत राहिलो तुला
गैरफायदा त्याचाच तु नेहमी उचलला
पण पुरे झाले; आता पुनः संधी देणार नाही
तुझी दखल आता मी खपवून घेणार नाही

नव्याने लिहावे लागले तरी पुनः लिहेन
आयुष्याचे प्रत्येक पान नव्याने रंगवेन
इच्छा तुझी मला हारताना बघण्याची
इच्छाच राहील कधीही न पूर्ण होणारी

© अक्षय समेल

Loading

The post प्रतिकार appeared first on Kavita.

]]>
https://www.marathit.com/kavita/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0/feed/ 0
कंदील विकणारी मुले https://www.marathit.com/kavita/%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a5%87/ https://www.marathit.com/kavita/%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a5%87/#respond Fri, 31 Mar 2023 06:47:34 +0000 https://www.marathit.com/kavita/?p=111 उत्साहाने घरचा आकाशकंदील करण्याच्या वयात त्यांनापरोपरीने सजवून विकणारी ही मुले यादिवाळीची खरेदी करीत हिंडणा-याश्रीमंत गर्दीची कुणीच लागत नाहीत…त्यांचे खानदान मुळातच वेगळे :ती आली आहेत उपासमारीच्या

The post कंदील विकणारी मुले appeared first on Kavita.

]]>
उत्साहाने घरचा आकाशकंदील करण्याच्या वयात त्यांना
परोपरीने सजवून विकणारी ही मुले या
दिवाळीची खरेदी करीत हिंडणा-या
श्रीमंत गर्दीची कुणीच लागत नाहीत…
त्यांचे खानदान मुळातच वेगळे :
ती आली आहेत उपासमारीच्या अर्धपोटी संसारातून;
किंवा संप-टाळेबंदीत हकनाक
देशोधडीला लागलेल्या कुटुंबांतून;
किंवा कर्त्याच्या अपमृत्यूने
छ्प्पर उडालेल्या घरांमधून; किंवा
आपल्याच आईने नवा यार शोधल्यावर
जमलेल्या अवघ्या नामुष्कीच्या अंधारातून…
थोडक्यात म्हणजे, कायमची
रात्र असलेल्या प्रदेशातील ही
अभागी मुले…
त्यांना आहे एकदम मान्य तुमचा
सर्वाधिकार प्रकाशावरचा. म्हणून तर ती
तुमचाच प्रकाश अधिक वैभवशाली दिसावा यासाठी
काठ्यांना रंगीबेरंगी आकाशकंदील अडकवून
भर बाजारात
तुमचीच वाट पाहत उभी आहेत…

द. भा. धामणस्कर

Loading

The post कंदील विकणारी मुले appeared first on Kavita.

]]>
https://www.marathit.com/kavita/%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a5%87/feed/ 0
ज्ञानी माणसानं https://www.marathit.com/kavita/%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%82/ https://www.marathit.com/kavita/%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%82/#respond Fri, 31 Mar 2023 06:46:54 +0000 https://www.marathit.com/kavita/?p=109 आत्यंतिक प्रेम करावं असं काहीकुणाला आढळलं की नेमकंउध्वस्त करणारच काही त्यालासापडलेलं आहे हे सत्यनिष्पाप माणसाला सांगायच नाही असाज्ञानी माणसानं निर्धार करायचाआणि असाही की जे अटळच

The post ज्ञानी माणसानं appeared first on Kavita.

]]>
आत्यंतिक प्रेम करावं असं काही
कुणाला आढळलं की नेमकं
उध्वस्त करणारच काही त्याला
सापडलेलं आहे हे सत्य
निष्पाप माणसाला सांगायच नाही असा
ज्ञानी माणसानं निर्धार करायचा
आणि असाही की जे अटळच आहे ते
आपल्यामुळे लवकर न येतो,
जे अटळच आहे त्याला
पूर्वतयारीशिवाय
निर्णायकपणे भिडण्याची कुणाची संधी
लांबणीवर न पडो…
ज्ञानी होण्याची सनद
इतरानांही मिळो –
जळत जळत सारे त्यांना(ही)
कळत जावो…

~ द. भा. धामणस्कर

Loading

The post ज्ञानी माणसानं appeared first on Kavita.

]]>
https://www.marathit.com/kavita/%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%82/feed/ 0
मी चराचराशी निगडित https://www.marathit.com/kavita/%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%9a%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%97%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%a4/ https://www.marathit.com/kavita/%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%9a%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%97%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%a4/#respond Fri, 31 Mar 2023 06:46:11 +0000 https://www.marathit.com/kavita/?p=107 प्रेम करणं ही माझीउपजत पवित्र प्रेरणा आहे.मीकरतो प्रेम झाडांवर, पक्ष्यांवर, आकाशावर,उन्हावर, चांदण्यावर आणिमाणसांवरदेखिल. मलाऐकायची नाहीत म्हणूनच तुमच्याभयभीत मनाची प्रेम न करण्याची कारणे. मलाऐकू येत नाही

The post मी चराचराशी निगडित appeared first on Kavita.

]]>
प्रेम करणं ही माझी
उपजत पवित्र प्रेरणा आहे.मी
करतो प्रेम झाडांवर, पक्ष्यांवर, आकाशावर,
उन्हावर, चांदण्यावर आणि
माणसांवरदेखिल. मला
ऐकायची नाहीत म्हणूनच तुमच्या
भयभीत मनाची प्रेम न करण्याची कारणे. मला
ऐकू येत नाही तुमची
हलक्या आवाजातील कुजबूज; मी
नाकारतो तुमचा मौल्यवान टेपरेकॉर्डर माझ्याविरुद्ध
उच्चारलेला हरेक शब्द मला पोहचवणारा…
मी फिरेन संवादत कधी जवळच्या झाडाशी, कधी
दूरच्या मेघाशी. एकटेपणा संपलेला
मी एक पुण्यात्मा आहे…मी
सर्व चराचराशी निगडित : सूर्यास्त पाहताना
मीही होतो निस्तेज; सांजवताना
काळाभोर हळूहळू. मी
नष्ट होतो रात्रीच्या अंधारात आणि उगवतो
नवा दिवस उजाडताना नवा जन्म झाल्यासारखा.

द. भा. धामणस्कर

Loading

The post मी चराचराशी निगडित appeared first on Kavita.

]]>
https://www.marathit.com/kavita/%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%9a%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%97%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%a4/feed/ 0
असता समीप दोघे https://www.marathit.com/kavita/%e0%a4%85%e0%a4%b8%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%aa-%e0%a4%a6%e0%a5%8b%e0%a4%98%e0%a5%87/ https://www.marathit.com/kavita/%e0%a4%85%e0%a4%b8%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%aa-%e0%a4%a6%e0%a5%8b%e0%a4%98%e0%a5%87/#respond Fri, 31 Mar 2023 06:45:06 +0000 https://www.marathit.com/kavita/?p=105 असता समीप दोघे हे ओठ मूक व्हावेशब्दांविना परंतु बोलून सर्व जावे अतृप्‍त मीलनाचे, विरहातही सुखाचेविश्वाहुनी निराळे हे विश्व प्रेमिकांचे ! फसवा वरून राग, रुसव्यात गाढ

The post असता समीप दोघे appeared first on Kavita.

]]>
असता समीप दोघे हे ओठ मूक व्हावे
शब्दांविना परंतु बोलून सर्व जावे

अतृप्‍त मीलनाचे, विरहातही सुखाचे
विश्वाहुनी निराळे हे विश्व प्रेमिकांचे !

फसवा वरून राग, रुसव्यात गाढ प्रीती
होता क्षणिक दूर वेडी मनात भीती

दिनरात चिंतनाचे अनिवार कौतुकाचे
विश्वाहुनी निराळे हे विश्व प्रेमिकांचे !

दूरातही नसावा दोघांमध्ये दुरावा
स्पर्शाविना सुखाने हा जीव मोहरावा

ओठी फुलून यावे स्मित गोड सार्थकाचे
विश्वाहुनी निराळे हे विश्व प्रेमिकांचे !

शांता शेळके

Loading

1
1

The post असता समीप दोघे appeared first on Kavita.

]]>
https://www.marathit.com/kavita/%e0%a4%85%e0%a4%b8%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%aa-%e0%a4%a6%e0%a5%8b%e0%a4%98%e0%a5%87/feed/ 0
आततायी अभंग https://www.marathit.com/kavita/%e0%a4%86%e0%a4%a4%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%af%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a4%82%e0%a4%97/ https://www.marathit.com/kavita/%e0%a4%86%e0%a4%a4%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%af%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a4%82%e0%a4%97/#respond Fri, 31 Mar 2023 06:44:15 +0000 https://www.marathit.com/kavita/?p=103 कारे नाडवीसी | आपुल्या मनासी ;पोषितो कुणासी ?| जगी कोण ?महारोग्यापोटी | पोरांची खिल्लारे ;जीवन तया रे | कोण देतो ? कोणे केली बाळा |

The post आततायी अभंग appeared first on Kavita.

]]>
कारे नाडवीसी | आपुल्या मनासी ;
पोषितो कुणासी ?| जगी कोण ?
महारोग्यापोटी | पोरांची खिल्लारे ;
जीवन तया रे | कोण देतो ?

कोणे केली बाळा | दु:खाची उत्पत्ती
वाढवी श्रीपती | पाप-पुण्य
कोणी दिली भूक ? | कोणे दिले रोग?
दारिद्र्याचे भोग दिले कोणी ?
दु:खाच्या अनंता | भोगितो संसार ;
येई भागाकार | आत्मरुपे.
आत्म्याचे हे गुह्य | ब्रह्माला ना ठावे ;
त्याच्या वंशा जावे | तेव्हा कळे.
जन्माच्या प्रश्नाला | मृत्युचे उत्तर;
देई विश्वंभर | दुजे काय ?

– विंदा करंदीकर

Loading

The post आततायी अभंग appeared first on Kavita.

]]>
https://www.marathit.com/kavita/%e0%a4%86%e0%a4%a4%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%af%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a4%82%e0%a4%97/feed/ 0
माझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली https://www.marathit.com/kavita/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3-%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%9d%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%b3/ https://www.marathit.com/kavita/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3-%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%9d%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%b3/#respond Fri, 31 Mar 2023 06:43:22 +0000 https://www.marathit.com/kavita/?p=101 कशासाठी आता पुन्हा भेटायाचे सांगदेणे घेणे उतू गेले फिटले ना पांगआता कशी श्वासांवर लावायाची बोलीमाझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली कधीकाळी होते इथे एक

The post माझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली appeared first on Kavita.

]]>
कशासाठी आता पुन्हा भेटायाचे सांग
देणे घेणे उतू गेले फिटले ना पांग
आता कशी श्वासांवर लावायाची बोली
माझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली

कधीकाळी होते इथे एक गर्द रान
एका बहराची ज्याने मिरवली आण
सरूपाला अरुपाची जाहली सवय
तेंव्हाचे हे भय ज्याचे झाले आता वय
एका खिळ्यासाठी कुणी जोपासावी ढोली
माझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली

आता माझ्या प्रार्थनेत तेवढा ना पीळ
आणि तुझ्या निळाईत नाही घननीळ
मंदिराच्या मंडपात मशिदीचा पीर
जीव ऐलतीर आणि डोळे पैलतीर
कोरड्या पात्रात उभी आठवण ओली
माझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली

– वैभव जोशी

Loading

The post माझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली appeared first on Kavita.

]]>
https://www.marathit.com/kavita/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3-%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%9d%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%b3/feed/ 0